Rain Alert महाराष्ट्र मध्ये पुन्हा मुसळधार पाऊस या जिल्ह्यात आदिवृष्टीचा धोका

 

Rain Alert मान्सून केरळात धडकल्यानंतर त्याचं अतिशय वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं आगमन झालं. मात्र आता हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे.

 

सुरुवातीला मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली होती. मान्सून केरळात धडकल्यानंतर त्याचं अतिशय वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं आगमन झालं. मात्र आता हवामान विभागाकडून (IMD) चिंतेत भर घालणारी बातमी समोर आली आहे.

 

 

 

 

महाराष्ट्रात मान्सूनचा वेग मंदावला आहे. राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. मात्र दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा वेग काहीसा मंदावला आहे.

 

वेगानं वाटचाल सुरू असलेल्या मान्सूननं गुरुवारी फारशी प्रगती केली नाही. सध्या हे नैऋत्य मोसमी वारे जळगाव, अमरावती भागातच असून ते पुढे सरकलेले नाहीत असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

 

बंगालच्या उपसागरावर सक्रिय असलेले नैऋत्य मोसमी वारे गेल्या पाच दिवसांपासून मंदावले आहेत. त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई आणि नाशिक भागांमध्ये पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

 

 

 

 

 

 

दरम्यान पश्चिम विदर्भात मान्सून दाखल झाला आहे. पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे पूर्व विदर्भात अजूनही मान्सून दाखल झाला नसून, पावसाची प्रतिक्षा आहे.

 

 

 

 

पावसाअभावी वातावरणात प्रचंड उकाडा असून, बुधवारी नागपुरात 41. 1 अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरसह, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे.

 

 

 

 

 

 

तर दुसरीकडे मराठवाडा आणि कोकणात मात्र पावसानं दमदार हजेरी लावली आहे, पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे.

Leave a Comment