Lek Ladki Yojana मुलीला माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिन्याला 1500 रुपये मिळणार

 

Lek Ladki Yojana मुलीचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देण्यासाठी ता. एक ऑगस्ट २०१७ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना लागू करण्यात आली होती. त्यानंतर ही योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना लागू करण्याचे राज्य शासनाने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले होते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात लेक लाडकी योजनेला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत एक हजार ६९१ लाभार्थी असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ७०१ लाभार्थींनी आपले अर्ज बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. त्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

 

‘लेक लाडकी’ ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांत मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येईल. त्याला अनुसरून ता. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केला असून, ही योजना ता. ३० ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने सेविका किंवा अधिकाऱ्यांना हे अर्ज अपलोड करणे बंधनकारक राहणार असून, त्यानंतरच या अर्जदारास या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Sambhaji Nagar News : अडीच हजार शेतकऱ्यांना मिळतेय दिवसा वीज!

लेक लाडकी योजनेचे काम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, महिला व बालविकास विभागात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी ताई परिश्रम घेत आहेत. लाभार्थींनी या योजनेसाठी अंगणवाडी ताईंना संपर्क साधत आवश्यक ती कागदपत्रे द्यावीत. आजघडीला एक हजार ६९१ लाभार्थी असून त्यापैकी ७०१ लाभार्थींची ऑनलाइन नोंदणी करण्याचे काम तालुका स्तरावर सुरू आहे.

Leave a Comment