Havaman andaj : राज्याच्या या जिल्ह्यात आज जोरदार अतिवृष्टी होणार

 

Havaman andaj पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महत्वाची सूचना पहा क्लिक करून.

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात आज सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. इथे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 25°C च्या आसपास असेल.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा येथे जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पण सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही.

 

 

Leave a Comment